Jitendra Awhad : हेमंत करकरे यांची हत्या झाली तेव्हाच निकाल लागला; मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यानंतर 65 किलो आरडीएक्स आले कुठून हा प्रश्न अनुत्तरित आहे. आतंकवादाला जात, धर्म, रंग, पंथ नसतो. तसेच आतंकवादाला धर्माचे नाव चिकटवणे योग्य नाही हे आधीपासून आम्ही सांगत आहोत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.