Manikrao Kokate : सख्खा भाऊ फोडल्याने माणिकराव कोकाटे संतापले- भाजप ‘बाटलेला’ पक्ष, त्यांचे आयुष्य फोडाफोडीतच चालले, शिंदेंवरही टीका
“भाजपचे आयुष्य केवळ दुसऱ्यांची घरे फोडण्यात चालले आहे. विधानसभेला माझ्या घरातील माणूस फोडला, आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्याही घरात फूट पाडली. भाजप हा आता पूर्णपणे ‘बाटलेला’ पक्ष झाला असून, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसले आहेत,” अशा अत्यंत तिखट शब्दांत राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सिन्नरमधील प्रचार सभेत कोकाटे यांनी मनातील खदखद व्यक्त केली.