Karuna Munde : धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार; करुणा मुंडे यांचा दावा, पंकजा मुंडे यांच्या पराभवात भाजपचाच हात असल्याचा आरोप
गत काही वर्षांपासून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या करुणा मुंडे शर्मा यांनी आज दीपावली पाडव्याच्या निमित्ताने त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राजकारणात पोटचा नव्हे तर विचारांचा वारसा असतो. हे धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखेच तळागाळात जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांचा संघर्ष मी 2009 ते 2019 पर्यंत पाहिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचाही आरोप केला.