Awhad-Padalkar : जितेंद्र आव्हाड – गोपीचंद पडळकर यांच्यात राडा; विधान भवनाच्या गेटवरच एकमेकांना शिवीगाळ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आज विधानभवनाच्या गेटवरच जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर गाडी अंगावर घालण्याचा आरोप केला. यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे. विधानभवनाच्या गेटवरच हा प्रकार घडल्यामुळे तिथे मोठी गर्दी जमली होती.