Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची कडाडून टीका- उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज, तुम्ही CM असताना काय केले? शेतीच्या बांधावर किती वेळा गेले?
उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांनी शेतकऱ्यांना काय दिले? शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे आधी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.