Fadnavis : बिहारचा निकाल काँग्रेसच्या विषारी प्रचाराला जनतेचे उत्तर; मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला- काँग्रेस पक्ष MIMच्याही खाली गेला
बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीवर असून जवळपास विजय हा निश्चितच झाल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्ली येथे असून पत्रकारांशी संवाद साधताना बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.