Pakistan Warship : 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच पाक युद्धनौका बांगलादेशात; दोन्ही देशांत जवळीक
1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच शनिवारी पाकिस्तानी युद्धनौका बांगलादेशात दाखल झाली. नौदलाची पीएनएस सैफ बंगालच्या उपसागरातून प्रवास करून दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने चार दिवसांच्या सदिच्छा भेटीसाठी बांगलादेशी बंदरात पोहोचली.