PM Shahbaz : ट्रम्प यांच्या क्रिप्टो व्यवसायाचा नवा पत्ता पाकिस्तान; पीएम शाहबाज यांच्या मुलाला मिळणार जबाबदारी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्रिप्टो व्यवसायाचे पडघम आता पाकिस्तानपर्यंत पोहोचले आहेत. वृत्तानुसार, ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने क्रिप्टो व्यवसायाचे नवे डेस्टिनेशन आता पाकिस्तान असणार आहे. या कंपनीची धुरा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे पुत्र सलमान शाहबाज यांच्याकडे असेल.