PM Paetongtarn Shinawatra : थायलंडमध्ये कोर्टाने पंतप्रधानांना पदावरून हटवले; कंबोडियन नेत्याशी बोलताना लष्करप्रमुखांवर केली होती टीका
थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने पंतप्रधान पायतोंगतार्न शिनावात्रा यांना त्यांच्या पदावरून निलंबित केले आहे. त्यांच्यावर कंबोडियन नेते हुन सेन यांच्याशी फोनवर बोलल्याचा आरोप आहे. या संभाषणात त्यांनी थाई लष्कराच्या कमांडरवर टीका केली. थायलंडमध्ये ही एक गंभीर बाब मानली जाते कारण तेथे लष्कराचा खूप प्रभाव आहे.