PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही
पाकिस्तानसोबत युद्धबंदी झाल्यानंतर ५१ तासांनी, पंतप्रधान मोदींनी सोमवारी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केले. आपल्या २२ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, युद्धबंदी, दहशतवाद, सिंधू पाणी करार आणि पीओके यावर भाष्य केले.