PM Modi : बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट ; AI तंत्रज्ञानासह अनेक मुद्द्यांवर झाली चर्चा
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, “नेहमीप्रमाणे, बिल गेट्स यांच्याशी एक अद्भुत भेट झाली. येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगले भविष्य घडवण्यासाठी तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यासह विविध मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली.”