PM Modi : कोण आहेत माखनलाल सरकार, ज्यांच्याकडून मोदींनी घेतले आशीर्वाद; 74 वर्षांपूर्वी श्यामा प्रसाद मुखर्जींशी जोडले
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पश्चिम बंगालमधील भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले. कोलकाता येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षाचे ९८ वर्षीय कार्यकर्ते माखनलाल सरकार यांची भेट घेतली. मोदींनी मंचावर पोहोचताच माखनलाल यांना मिठी मारली, नमस्कार केला आणि त्यांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतले.