PM Modi : 18वा रोजगार मेळावा आज- पंतप्रधान 61 हजार जॉब लेटर वाटणार; देशभरातील 45 ठिकाणी आयोजन
पंतप्रधान मोदी शनिवारी 18व्या रोजगार मेळ्यात 61 हजार नियुक्ती पत्रे वाटणार आहेत. या नियुक्त्या गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, उच्च शिक्षण विभाग तसेच इतर विभागांमध्ये करण्यात आल्या आहेत. रोजगार मेळ्याचे आयोजन देशभरातील 45 ठिकाणी केले जाईल.