PM Lawrence : सिंगापूरच्या निवडणुकीत PM लॉरेन्स वोंग विजयी; 97 पैकी 87 जागा जिंकल्या
पंतप्रधान लॉरेन्स वोंग आणि त्यांच्या पीपल्स अॅक्शन पार्टी (PAP) ने शनिवारी सिंगापूरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला. पक्षाने ९७ पैकी ८७ संसदीय जागा जिंकल्या. विजयानंतर पंतप्रधान वोंग म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या मजबूत जनादेशाबद्दल आम्ही आभारी आहोत. आम्ही आणखी कठोर परिश्रम करून तुमचा विश्वास सार्थ ठरवू.