PM Advisory : महिलांना दरमहा मिळणारी रोख रक्कम वाढवली पाहिजे; पीएमच्या आर्थिक सल्लागार परिषदेची राज्यांना रोख योजनेवर सूचना
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईएसी-पीएम) सोमवारी सांगितले की, राज्यांमधील महिलांशी संबंधित रोख मदत योजनांच्या रकमेचे वेळोवेळी पुनरावलोकन केले पाहिजे. परिषदेने म्हटले की, महागाई वाढल्याने आणि कुटुंबांच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास रोख रक्कम वाढवली पाहिजे.