Ahmedabad Plane Crash : विमानात 11A सीटची मोठी मागणी; अहमदाबाद अपघातात या सीटवर बसलेला प्रवासी वाचला होता
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, त्यात २६० जणांचा मृत्यू झाला. रमेश विश्वास नावाचा एक प्रवासी या अपघातातून चमत्कारिकरित्या बचावला. या विमानात ‘११ए’ क्रमांकाच्या सीटवर विश्वासकुमार बसले होते. ही सीट आपत्कालीन एक्झिटजवळ होती. तेव्हापासून या सीटची मागणी वाढली आहे. हवाई प्रवासी आता या सीटसाठी अतिरिक्त शुल्क देण्यास तयार आहेत.