Piyush Goyal : ‘भारत बंदुकीच्या धाकावर डील करत नाही’, अमेरिकेशी व्यापार चर्चेवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची रोखठोक भूमिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर कर लादण्याची घोषणा केली असताना, भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत आणि अमेरिकेत व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की भारताचे हित सर्वोपरि राहील आणि कोणत्याही दबावाखाली चर्चा केली जाणार नाही.