Sharad Pawar, : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा; ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या ‘पिपाणी’ (ट्रम्पेट) चिन्हामुळे मोठा फटका बसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला अखेर निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आपल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत.