Sonam Wangchuk : लडाख DGP म्हणाले- वांगचुक पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात होते, त्यांनी बांगलादेश दौराही केला; सध्या जोधपूर तुरुंगात
लडाखचे डीजीपी एसडी सिंह जामवाल यांनी शनिवारी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या एका सदस्याशी संपर्क होता. पीआयओ सदस्याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. तो पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पाठवत होता. आमच्याकडे याचे रेकॉर्ड आहेत.