Pinarayi Vijayan : केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर EDची छापेमारी; CMRL मनी लॉन्डरिंग प्रकरणामुळे खळबळ
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी केरळचे माजी मुख्यमंत्री Pinarayi Vijayan यांच्या निवासस्थानासह राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली. ही कारवाई CMRL अर्थात कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेडशी संबंधित कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात करण्यात आली असून, या प्रकरणात विजयन यांच्या मुलीच्या कंपनीचे नाव समोर आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.