Pinaka Guided Rocket : भारताच्या पिनाका रॉकेटची चाचणी यशस्वी; 120 किमी रेंज, लक्ष्यावर अचूक हल्ला केला
भारताने सोमवारी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीतून पिनाका लाँग रेंज गाईडेड रॉकेट (LRGR-120) ची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली. यावेळी रॉकेटला त्याच्या कमाल 120 किलोमीटरच्या पल्ल्यापर्यंत डागण्यात आले.