• Download App
    Pimpri Chinchwad Municipal Election 2025 | The Focus India

    Pimpri Chinchwad Municipal Election 2025

    Pune Pimpri : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींसह ठाकरेंना धक्का; अनेक माजी नगरसेवकांच्या हाती कमळ

    आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागताच राजकीय आखाड्यात मोठे भूकंप होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलणारी मोठी घडामोड आज मुंबईत पार पडली. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला मोठे यश मिळाले असून, अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.

    Read more