Ajit Pawar : अजित पवार पुण्यात काँग्रेसशी आघाडी करणार? सतेज पाटलांशी फोनवरून साधला संवाद
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आपला मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यात उभय नेत्यांत संभाव्य आघाडीविषयी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.