• Download App
    pigeon | The Focus India

    pigeon

    Fadnavis : समाजाच्या आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे; कबुतरखानाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

    मुंबईतील कबुतरखान्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, पहिल्यांदा लोकांचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे. त्याचसोबत काही आस्थेचे विषय आहेत त्याची पण आपण काळजी घेऊ शकतो. त्यातून आपण मार्ग काढू शकतो. समाजाचे आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. तसेच हा वादाचा मुद्दा नसून हा समाजाचा प्रश्न असल्याचे फडणवीस म्हणाले.

    Read more

    Manisha Kayande : जैन मुनींच्या इशाऱ्याल मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर- ज्यांना कबुतरे आवडतात, त्यांनी ती घरी पाळावीत; सार्वजनिक ठिकाणी त्रास नको!

    मुंबईच्या दादरच्या कबुतरखान्यावरून वाद चांगलाच चिघळला आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी या प्रकरणी सरकारला आव्हान दिले आहे. धर्माच्या विरोधात गेल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच, भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिंदे गटाच्या शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा एकेरी उल्लेख केला.

    Read more

    Jain Monk : कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा; म्हणाले – धर्माविरोधात जाल, तर कोर्टालाही मानणार नाही

    मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाचा आदेश लागू असूनही अलीकडेच दादर कबुतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी कबुतरांना धान्य टाकले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना थांबवले. या कारवाईनंतर जैन समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, 13 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहेत. तर वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रंही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नसल्याचा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.

    Read more

    Pigeons at Dadar : दादरचे कबुतरखाना प्रकरण; अन्न-पाणी देण्यावर बंदी कायम; तज्ज्ञ समितीने सखोल अभ्यास करण्याचे न्यायालयाकडून निर्देश

    उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला होता. यावरून जैन समाज आक्रमक झाला होता. त्यांनी कबुतरखान्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकली होती. यामुळे जैन समाज बांधव आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट देखील झाली होती. त्यानंतर आज देखील दादरमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज उच्च न्यायालयात झाली. यात न्यायालयाने आधी दिलेला आदेश कायम ठेवला आहे. इतकेच नाही तर आदेशाचे पालन केले जाईल, याची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे.

    Read more

    कबूतर पकडण्याच्या नादात सीमा ओलांडून आला, पण पाकिस्तान सरकारने १४ वर्षांचा मुलगा सोडून दिला

    विशेष प्रतिनिधी चंडीगढ : पाकव्याप्त काश्मीरमधील टाट्रिनाट गावातील असमद हा चौदा वर्षे वयाचा काश्मीरी मुलगा त्याच्या कबुतराला पकडण्याच्या नादात तीन महिन्यांपूर्वी भारतीय हद्दीत आला. मात्र, […]

    Read more

    पंजाब पोलीसांनी केली पाकिस्तानी कबुतरला अटक

    पंजाब सीमेवर पोलीसांनी चक्क एका पाकिस्तानी कबुतराला अटक केलीआहे. या कबुतराच्या पायाशी एक चिठ्ठी बांधळी असून त्यावर एक नंबर लिहिला आहे. हे कबुतर हेरगिरीसाठी वापरले […]

    Read more