Pigeon Houses : कबुतरखान्यांवरील बंदीचा निर्णय कायम, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका
कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी आरोग्याला धोका असल्याने, मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला संमती दिली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील तोच निर्णय कायम ठेवलेला आहे. तसेच बंदीचा आदेश मोडून कबुतरखान्यांच्या जागी काबुतारंना दाणे टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून, या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. या उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधातील अपील सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळले.