Prithviraj Chavan : महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधानपदी- पृथ्वीराज चव्हाण यांच्या ट्वीटमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चांना उधाण
अमेरिकेत सध्या गाजत असलेल्या ‘एपस्टाईन फाईल्स’ची माहिती बाहेर आल्यास भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो. या राजकीय उलथापालथीत कदाचित येत्या महिनाभरात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झालेला पाहायला मिळेल,” असे सूचक आणि खळबळजनक विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आणि सोशल मीडियावरील एका ट्विटमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी कराड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.