Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात फोटोग्राफी-रील काढण्यास बंदी; माध्यम कर्मचाऱ्यांनी नियम मोडल्यास महिनाभर प्रवेश नाही
सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या मुख्य कॅम्पसला उच्च सुरक्षा क्षेत्र म्हणून घोषित करून फोटोग्राफी, सोशल मीडिया रील आणि व्हिडिओग्राफी करण्यास बंदी घातली आहे. १० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात न्यायालयाने माध्यमांसाठीही सूचना जारी केल्या आहेत.