• Download App
    Phaltan Doctor Suicide | The Focus India

    Phaltan Doctor Suicide

    Phaltan Doctor Suicide : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, कुटुंबाला सुरक्षा द्या, दोषींना कठोर शिक्षा करा; राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी

    फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली असून या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

    Read more

    Prakash Mahajan : फलटण प्रकरणी प्रकाश महाजनांचा सवाल- चारित्र्यहनन करणाऱ्या रूपाली चाकणकर अजूनही पदावर कशा?

    फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी थेट फलटण पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे. मृत डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकले आहेत? असा सवाल महाजन यांनी विचारला आहे.

    Read more

    Phaltan Doctor Suicide : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन; महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात होणार तपास, निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय

    फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन, राज्याचे पोलिस महासंचालक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, हा संपूर्ण तपास एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडून केला जाईल, जेणेकरून प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी.

    Read more

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक-एक नवीन अपडेट समोर येत आहेत. त्यातच आता तिच्या वडिलांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील, अशा शब्दांत त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. शिवाय या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून बीडच्या न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी मृत डॉक्टरच्या वडिलांनी केली.

    Read more

    CM Fadnavis : डॉक्टर आत्महत्येप्रकरणी CM फडणवीसांनी माजी खासदारांवरील आरोप फेटाळले; रणजितसिंह निंबाळकरांचा काही संबंध नाही

    सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या मृत्यूने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे निंबाळकरांवरील आरोप फेटाळून लावले आहेत. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    Read more

    CM Fadnavis : तरुण डॉक्टरची आत्महत्या दु:खद; आरोपींना कठोर शिक्षा होईल, कुणालाही सोडणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, तरूण महिला डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचेही म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.

    Read more