Pensioners : आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना मिळणार मोठा दिलासा!
केंद्र सरकार ८ व्या वेतन आयोगांतर्गत पेन्शनधारकांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत आहे. आता कम्युटेड पेन्शन मिळवण्याचा कालावधी १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही मागणी कर्मचाऱ्यांची प्रतिनिधी संस्था असलेल्या राष्ट्रीय परिषदेने (जेसीएम) सरकारला दिलेल्या मागणीच्या सनदपत्राचा भाग आहे. जर ही मागणी मान्य झाली तर लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना लवकरच पूर्ण पेन्शन मिळू लागेल.