Bawankule : हनी ट्रॅप, पेनड्राइव्ह या सर्व शिळ्या भाकरी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांना टोला
भाजप नेते तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनी ट्रॅपच्या मुद्यावरून सरकारवर चौफेर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. हनी ट्रॅप व पेन ड्राईव्ह या सर्व शिळ्या भाकरी आहेत. विरोधक मीडियातील आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वाढवून, चढवून बोलतात, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांना आपली उंची पाहून बोलण्याचाही उपरोधिक सल्ला दिला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही निशाणा साधला.