Public Sector Banks : किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड; पाच वर्षांत 11 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी खातेदारांकडून 9,000 कोटी रुपये वसुली
गेल्या ५ वर्षांत, देशातील ११ सरकारी बँकांनी त्यांच्या बचत खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून सुमारे ९,००० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून मासिक आधारावर दंड आकारला, तर काहींनी तिमाही आधारावर तो वसूल केला.