BJP Ravi Landge : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पहिला गुलाल! रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध; अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडींच्या बाबतीत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने आपली पकड घट्ट केली असून, यामध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर भाजपच्या खात्यात आता 12 व्या बिनविरोध उमेदवाराची भर पडली असून, पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदारसंघाच्या प्रभाग 6 ‘ब’ मधून रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या वाढत्या आकड्यामुळे निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.