सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी झाले वेगळे, आता पुन्हा सत्तेसाठी एकत्र!!
सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी झाले वेगळे, आता पुन्हा सत्तेसाठी एकत्र!!, हा राजकीय प्रकार पवार काका – पुतण्यांच्या राष्ट्रवादी मधून समोर आला आहे. महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक झाली तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती किंवा आघाडी करायचा अधिकार स्थानिक नेतेमंडळींनाच देण्यात आला