सत्तेच्या कामासाठी संघ स्पृश्य; पण सामाजिक कामासाठी अस्पृश्य; यशवंत + पवार संस्कारांचा पुरोगामी ढोंगी स्पर्श!!
सत्तेच्या कामासाठी संघ स्पृश्य, पण सामाजिक कामासाठी अस्पृश्य; यशवंत + पवार संस्कारांचा पुरोगामी ढोंगी स्पर्श!!, असं म्हणायची वेळ शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवारांच्या एका ट्विट मुळे आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर रोहित पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी संस्कारांची आठवण करून देणारे ट्विट केले. त्यांनी त्यात अजित पवारांना टोले हाणले. जणू काही अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या संघाच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे “फार मोठे पाप” घडले, असा आव रोहित पवारांनी त्या ट्विट मधून आणला. त्या ट्विटला यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या “पुरोगामी संस्कारांची फोडणी” दिली.