‘मी कधीही हिंदीला विरोध केला नाही’ ; पवन कल्याण यांनी भाषा वादावर केली भूमिका स्पष्ट
जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या नेत्यांवर टीका केली आणि राज्यात हिंदी लादल्याचा आरोप करणे हा ढोंगीपणा असल्याचे म्हटले. ते म्हणाले की हे नेते हिंदीला विरोध करतात पण आर्थिक फायदा मिळवण्यासाठी तमिळ चित्रपट हिंदीत डब करून घेतात. या विधानानंतर त्यांनी असेही स्पष्ट केले की त्यांनी कधीही हिंदीला विरोध केलेला नाही.