Shiv Sena : शिवसेनेवर 21, 22 जानेवारीला सलग 2 दिवस सुनावणी; सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी 5 तासांचा अवधी
शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत आज अखेर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरूवात झाली. त्यात न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही पक्षकारांना युक्तिवादासाठी किती वेळ लागेल? अशी विचारणा करत त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सुनावणी 21 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकली. कोर्टाने या प्रकरणी 21 व 22 असे सलग दोन दिवस सुनावणी होण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे पुढच्या सुनावणीत न्यायालय दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आपला निकाल देऊ शकते किंवा तो राखून ठेवू शकते. या सुनावणीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.