Parliament : संसद अधिवेशनानंतर भाजप अध्यक्ष निवडीची प्रक्रिया वेगवान होईल
भारतीय जनता पक्षाला (भाजप) लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर पक्षात नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया वेगवान केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी संसदेचे अधिवेशन संपताच भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांची तयारी सुरू होईल.