Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन: बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक; सरकारकडून 7 महत्त्वाची विधेयके सादर होणार
संसदचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होत असून, यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. बिहारच्या मतदार यादीचा सखोल आढावा घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचालींवरून विरोधकांनी केंद्र सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेस यांसारख्या पक्षांनी या मुद्द्यावर सरकारला अडचणीत आणण्याचे नियोजन केले आहे.