Parinay Phuke : बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून काढतायत मोर्चा; परिणय फुके यांची राज-उद्धव मेळाव्यावर टीका
त्रिभाषा धोरणाचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर, ठाकरे गट आणि मनसेने उद्या (5 जुलै) रोजी वरळी डोम येथे संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र, या मेळाव्यावर भाजपकडून जोरदार टीका होत असून, भाजप आमदार परिणय फुके यांनी खास कवितेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.