Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार, मी मुख्यमंत्री असेपर्यंत योजना बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदार प्रचार सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज परभणीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सभेत बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे विधान फडणवीसांनी केले आहे.