Pannu : खलिस्तानी अतिरेकी पन्नूची कपिल शर्माला धमकी; कॅनडात हिंदुत्व विचारसरणी चालणार नाही; भारतात परत जा!
खलिस्तान जनमत मोहीम चालवणारी संघटना शीख फॉर जस्टिस (SFJ) चा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने विनोदी कलाकार कपिल शर्मा आणि त्याच्या कॅनडातील सरे येथील कॅप्स कॅफेला धमकी दिली आहे. दहशतवादी पन्नूने एक व्हिडिओ संदेश जारी करून गोळीबाराची घटना संशयास्पद असल्याचा दावा केला आहेच, तर कपिल शर्माला ‘हिंदुत्व गुंतवणूकदार’ म्हणून संबोधून कॅनडा सोडण्याची धमकीही दिली आहे.