Supriya Sule : मांसाहाराच्या वक्तव्यावरून भाजपची सुप्रिया सुळेंवर टीका, आचार्य तुषार भोसले म्हणाले- असे विधान निव्वळ मूर्खपणा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला काय अडचण आहे?” या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटले.