रामतीर्थ गोदा प्राच्यविद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कारची ऐतिहासिक घोषणा; ऋग्वेदाचे मूर्धन्य विद्वान वेदमूर्ती पं. राजेश्वर शास्त्री जोशी यांची एकमताने निवड!!
भारतीय जीवनदृष्टीतील अध्यात्म, सेवा, करुणा, संस्कृती, राष्ट्रसंस्कार व सामाजिक समरसतेच्या चिरंतन परंपरेला नवचैतन्य देण्याचे कार्य रामतीर्थ गोदावरी सेवा समिती गेल्या अनेक वर्षांपासून करत असून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार प्रदान करण्याची परंपरा समितीने निर्माण केली आहे. या परंपरेचा विस्तार करत यावर्षीपासून भारतीय ज्ञानपरंपरेच्या व्यापक विश्वाला समर्पित असा एक नवा राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला असून त्याचे नाव “रामतीर्थ गोदा प्राच्यविद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार” असे घोषित करण्यात आले आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने यासंदर्भात आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.