• Download App
    Pandharpur Development Plan | The Focus India

    Pandharpur Development Plan

    Mahayuti Govt : महायुती सरकारची मोठी घोषणा- पंढरपुरातील 213 सफाई कामगारांना 600 चौरस फुटांची घरे

    सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर शहरातील 213 सफाई कामगारांना प्रत्येकी 600 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील. त्यासाठी 55 कोटी 61 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.

    Read more