Pakistani security : रेल्वे अपहरणानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये स्फोट
पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तानमधील नौश्की येथे सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये स्फोट झाला. या हल्ल्यात पाच लष्करी अधिकारी शहीद झाले. तर १२ सैनिक जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बलुच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तान सरकारने या हल्ल्याचा निषेध केला आहे.