Pakistani army : नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारताच्या कारवाईने पाकिस्तानी सैन्य धास्तावले
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत अॅक्शन मोडमध्ये आहे. पाकिस्तान सरकार आणि सैन्य धास्तावलेले आहे. त्यांची निराशा स्पष्टपणे दिसून येते आहे. पाकिस्तानी सैन्याने सलग पाचव्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. भारतीय लष्कराने याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.