Pakistani airspace : पाकिस्तानी एअरस्पेस बंद, अमेरिका अन् युरोपच्या उड्डाणांवर परिणाम शक्य; अटारी सीमेवर आता जवानांचे हस्तांदोलन नाही
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पाऊल उचलले आहे. यात सर्वात मोठे पाऊल अटारी-वाघा सीमा तात्पुरती बंद केली आहे. ही सीमा दोन्ही देशांत रोज सायंकाळी होणाऱ्या रिट्रीट समारंभ आणि मर्यादित व्यापारासाठी महत्त्वाची मानली जाते. सरकारकडून सांगितले की, जोवर स्थिती सामान्य होत नाही, तोवर अटारी सीमेवर भारतीय गेट उघडले जाणार नाही. यासोबत दररोज सूर्यास्ताला होणारा ध्वजारोहण कार्यक्रम आता भारतीय व पाकिस्तानी सैनिकांतील हस्तांदोलन प्रक्रियाही बंद केली आहे.