Kulendra Sharma : आसाममध्ये हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्याला हेरगिरीप्रकरणी अटक; पाकिस्तानी एजंटला सोशल मीडियाद्वारे माहिती देत होता
आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातून पोलिसांनी एका निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपीची ओळख कुलेंद्र शर्मा अशी झाली आहे. कुलेंद्रवर पाकिस्तानी गुप्तहेर एजंटशी संबंध असल्याचा आरोप आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी ही अटक केली.