Donald Trump : अमेरिकेची पाकिस्तानशी ऑइल डील; तेल काढण्यासही मदत करणार, ट्रम्प म्हणाले- कुणास ठाऊक एक दिवस PAK भारतालाच तेल विकेल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल कराराची घोषणा केली आहे. याअंतर्गत पाकिस्तानचे तेल साठे विकसित केले जातील. भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल असा दावाही त्यांनी केला.