Afghanistan : अफगाणिस्तान 3 महिन्यांत पाकसोबत व्यापार थांबवणार; तालिबानने व्यापाऱ्यांना अल्टिमेटम दिला
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने व्यापारी आणि उद्योगपतींना पर्यायी व्यवसाय मार्ग शोधण्याचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर म्हणाले की, पाकिस्तानसोबतची सीमा बंद केल्याने व्यापार थांबला आहे.